॥ श्री महामाया नमोस्तुते ||
कर्नाटक सरकार
धार्मिक दत्ति इलाखा
श्री शांतादुर्गा महामाया याने महामाया देवी देवस्थान, चित्ताकुला येथील सर्व भावीक लोकांस कळविण्यात येते की श्रीची प्रतिवार्षिक
भांडीची जत्रा
कार्तिक कृष्णपक्ष प्रतिपदा गुरुवार ता. 6-11-2025 रोजी होणार असून सकाळी 8.00 वाजता कार्याला सुरुवात होईल. दुपारी 2.30 वाजता तुळाभार होईल. तसेच कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी शनिवार ता. 8-11-2025 रोजी.
वनभोजन जत्रा
होणार असुन संध्याकाळी ठीक 4.30 वाजता श्रीची मिरवणूक वनात जायला निघेल. व वनातून रात्री 10.00 वाजता परत मंदिराकडे यायला निघेल. रात्री 12.00 वाजता संगीत पौराणिक खेळ,
चंड मुंड वध (बाल कलाकार)
(लेखक गणपती कुमर्स नाईक, कणसगिरि)
सादर करण्यात येईल.
कार्तिक कृष्णपक्ष पंचमी रविवार ता. 9-11-2025 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता दहीकाला होणार असून 6.30 वाजता पालखी अवभृत स्नानासाठी निघणार आहे. तरी भजकांनी यांची नोंद घेऊन जत्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे कळावे ही विनंती.
सदाशिवगड
कारवार
कर्नाटक सरकार हिंदू धार्मिक आणि
धर्मदायी दत्ति इलाखा, कारवार आणि पर्यवेक्षक श्री शांतादुर्गा माहामाया याने महामाया देवी देवस्थान, चित्ताकुला, सदाशिवगड, कारवार
वि. सूचना :
- मंगळवार दिनांक 4-11-2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता भांडीचे आडे चढविण्यात येईल.
- सर्व कुळावी आणि ग्रामस्थाने परंपरे प्रमाणे व सेवेकराने निर्धिष्ठ वेळेवर हजर राहून आपली जबाबदारी व कामे नीट पार पाडूनवेळेवर सर्व कार्यक्रम व्यावस्थित पार पाडण्यास सहकार्य करावे.
- सौभाग्यवती दिवज कान्नीनी नऊवारी साडी परीधान करावी हि विनंती.
- वनभोजन ठीकाणि शिस्त, शांततेने देवीचा प्रसाद ग्रहण करावा व प्रत्येक भक्ताने सहकार्य करावे हि विनंती.
- तसेच सदर जत्रोत्सवासाठी फळफळावळ व वर्गणी वर्षा प्रमाणे देवस्थानांत आणून देणे.
